भारतीय रेल्वेमध्ये India Railways Bharti नोकरीची सुवर्णसंधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) गट ‘ड’ (Group D) अंतर्गत तब्बल 22195 रिक्त पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅक मेंटेनर यांसारख्या विविध पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
India Railways Bharti महत्वाचा तपशील
- एकूण पदे: 22195
- पदांची नावे: असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर (गट ‘ड’).
- शैक्षणिक पात्रता: उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा किंवा त्याच्याकडे आयटीआय (ITI) पदवी असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा: 18 ते 33 वर्षे (1 जानेवारी2026 पर्यंत). सरकारी नियमांनुसार एससी/एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षे, ओबीसीसाठी ३ वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी १० वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
- वेतन: 18000 रुपये प्रति महिना.
India Railway Bharti अर्ज शुल्क आणि प्रक्रिया:
उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये, तर मागासवर्गीय, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला उमेदवारांसाठी 250 रुपये परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 मार्च 2026 पर्यंत आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.rrbmumbai.gov.in किंवा https://indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



