---Advertisement---

SFIO भरती 2026: ‘गंभीर कपट अन्वेषण’ कार्यालयात 45 पदांची भरती; मुंबईसह मोठ्या शहरांत काम करण्याची संधी!

March 4, 2026 5:37 PM
SFIO भरती 2026
---Advertisement---

Serious Fraud Investigation Office (SFIO) Recruitment 2026: भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘गंभीर कपट अन्वेषण कार्यालयात’ (SFIO) विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईसह दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद येथे काम करण्याची संधी मिळणार आहे.

SFIO भरती 2026: महत्त्वाची सूचना:

ही पदे डेप्युटेशन (Deputation) तत्त्वावर भरली जाणार आहेत. त्यामुळे केवळ केंद्र किंवा राज्य सरकार, स्वायत्त संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये काम करणारे अधिकारीच यासाठी पात्र आहेत. खाजगी उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

SFIO भरती 2026: पदांचा तपशील (Vacancy Details)

एकूण 45 पदांची भरती केली जाणार असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

पदाचे नावएकूण पदेपे-मॅट्रिक्स स्तर (7th CPC)
जॉइंट डायरेक्टर (Capital Market)01Level-12
डेप्युटी डायरेक्टर (Corporate Law/Investigation)16Level-11
सीनियर असिस्टंट डायरेक्टर (Banking, Investigation, Taxation इ.)13Level-10
सीनियर प्रॉसिक्युटर03Level-10
असिस्टंट डायरेक्टर (Investigation)12Level-08
प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी01Level-11

मिळणारे विशेष फायदे:

निवड झालेल्या उमेदवारांना मूळ पगाराच्या (Basic Pay) 20% विशेष सुरक्षा भत्ता (Special Security Allowance) देय असेल.


अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख:

  • अर्ज करण्याची पद्धत: इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज योग्य मार्गाने (Proper Channel) विहित नमुन्यात पाठवायचे आहेत.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Director, Serious Fraud Investigation Office, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.
  • शेवटची तारीख: ही जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत अर्ज पोहोचणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या लिंक्स:अधिकृत संकेतस्थळ:www.sfio.nic.in किंवा www.mca.gov.in

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment