---Advertisement---

SBI SCO Recruitment 2026: SBI मध्ये ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख

March 12, 2026 4:17 PM
SBI-Recruitment-2026
---Advertisement---

SBI SCO Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्स (SCO) च्या विविध पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

या भरती प्रक्रियेद्वारे माहिती तंत्रज्ञान (IT), जोखीम व्यवस्थापन (Risk Management) आणि ऑडिट (Audit) विभागातील विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

SBI SCO Recruitment 2026: रिक्त पदांचा तपशील आणि पात्रता

SBI ने तीन वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून खालील प्रमुख पदांसाठी अर्ज मागवले आहेत:

१. आयटी सुरक्षा आणि तंत्रज्ञान विभाग (IT Security & Technology):

  • पदे: डेप्युटी मॅनेजर (IT Security Expert, Emerging Technology, Cyber Security Analyst, Incident Management & Forensics, Test Engineers).
  • एकूण जागा: 30.
  • पात्रता: B.E./B.Tech (CS/IT/Electronics) किंवा MCA/M.Sc (CS/IT) मध्ये किमान 50 % गुण आणि किमान 4 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.

२. जोखीम व्यवस्थापन (Climate Risk Management):

  • पद: मॅनेजर (Risk Specialist- Climate Risk).
  • जागा: 02
  • पात्रता: पर्यावरण अभियांत्रिकी (Environmental Engineering) मध्ये BE/B.Tech किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव.

३. ऑडिट विभाग (IS & Internal Audit):

  • पदे: असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS Audit) आणि डेप्युटी मॅनेजर (IS Audit, CA- Internal Audit).
  • जागा: 61 पेक्षा जास्त जागा.
  • पात्रता: संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी किंवा CA (Chartered Accountant) आणि किमान 1 ते 6 वर्षांचा अनुभव.

SBI SCO Recruitment 2026:  महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 23 फेब्रुवारी 2026.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15/16 मार्च 2026.

SBI SCO Recruitment 2026: अर्ज शुल्क (Application Fee)

  • सामान्य/EWS/OBC उमेदवार: 750 रुपये.
  • SC/ST/PwBD उमेदवार: शुल्क नाही.

SBI SCO Recruitment 2026:  निवड प्रक्रिया (Selection Process)

उमेदवारांची निवड प्रामुख्याने शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर (Shortlisting & Interview) आधारित असेल. मुलाखत 100 गुणांची असेल आणि अंतिम गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीच्या गुणांवरून तयार केली जाईल.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी SBI च्या अधिकृत करिअर वेबसाइट https://sbi.bank.in/web/careers वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment