Ordnance Factory Bhandara Bharti: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा (भंडारा, महाराष्ट्र) येथे ‘Danger Building Worker’ (DBW) या पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या या युनिटमध्ये कंत्राटी तत्त्वावर ही पदे भरली जाणार आहेत.
Ordnance Factory Bhandara Bharti: भरतीचा पूर्ण तपशील
| पदाचे नाव | एकूण जागा | आरक्षण (Category-wise) |
| DBW Personnel | 400 | UR-176, OBC-108, SC-40, ST-36, EWS-40 |
टीप: यामध्ये माजी सैनिकांसाठी (Ex-SM) 40 जागांचे समांतर आरक्षण (Horizontal Reservation) असेल.
Ordnance Factory Bhandara Bharti: पात्रता आणि अटी
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे NAC (National Apprentice Certificate) असणे अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र AOCP (Attendant Operator Chemical Plant) ट्रेडमध्ये असावे (NCTVT/NCVT कडून प्राप्त).
वयोमर्यादा (28/03/2026 रोजी): 18 ते 40 वर्षे.
- SC/ST: 5 वर्षांची सूट.
- OBC (NCL): 3 वर्षांची सूट.
- माजी सैनिक: सेवा कालावधी + 3 वर्षे.
वेतन आणि फायदे :
मूळ वेतन: 19,900/- रुपये + महागाई भत्ता (DA) असणार आहे त्याशिवाय कामाच्या स्वरूपावर आधारित इतर भत्ते आणि नियमानुसार वार्षिक वाढ (Increment) मिळेल.
Ordnance Factory Bhandara Bharti: निवड प्रक्रिया :
1. गुणवत्ता यादी (Merit List): उमेदवारांची निवड ही प्रामुख्याने त्यांच्या NCTVT परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आणि Apprentice मधील कामगिरीच्या आधारावर केली जाईल.
2. कागदपत्र पडताळणी: निवड झालेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल.
3. वैद्यकीय चाचणी: संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शारीरिक क्षमता आणि वैद्यकीय मानक पूर्ण करणे गरजेचे आहे.
Ordnance Factory Bhandara Bharti: अर्ज कसा करावा?
ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे.
1. अधिकृत वेबसाईटवरून अर्जाचा नमुना (Application Format) डाऊनलोड करा.
2. अर्ज पूर्ण भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या (SSC बोर्ड सर्टिफिकेट, NAC सर्टिफिकेट, जातीचा दाखला इ.) साक्षांकित प्रती जोडा.
3. अर्जाचा लिफाफा खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवा:
पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara, District: Bhandara, Maharashtra – 441906.
- लिफाफ्यावर काय लिहावे: Application for the post of DBW Personnel on Tenure Basis
- अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 25 मार्च 2026 (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत).
Ordnance Factory Bhandara Bharti: महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट: https://munitionsindia.in
अर्जाचा नमुना: https://ddpdoo.gov.in/documents/doc/2fcf7a5f6a1b871a505dfeb79b9d7cc0.pdf





