---Advertisement---

12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअरची संधी! NCHM JEE 2026 परीक्षेसाठी नोंदणी सुरू; असा करा अर्ज

March 29, 2026 10:20 AM
NCHM JEE 2026
---Advertisement---

NCHM JEE 2026 for 12th Students: ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच 12 वीची परीक्षा दिली आहे किंवा जे सध्या 12वीत आहेत, त्यांच्यासाठी देशपातळीवर हॉटेल मॅनेजमेंट प्रवेशाचे द्वार उघडले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे B.Sc. (Hospitality & Hotel Administration) या पदवी अभ्यासक्रमासाठी NCHM JEE 2026 प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परीक्षेच्या माध्यमातून देशातील टॉपच्या ‘आयएचएम’ (IHM) संस्थांमध्ये प्रवेश मिळवून तुम्ही तुमचे ग्लॅमरस करिअर सुरू करू शकता.

NCHM JEE 2026 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत: 26 फेब्रुवारी 2026 ते 5 एप्रिल 2026 (रात्री 9.50 पर्यंत).
  • अर्जात दुरुस्ती करण्याची संधी: 7 एप्रिल ते 9 एप्रिल 2026.
  • प्रवेश परीक्षेची तारीख: 8 मे 2026 (शुक्रवार).
  • परीक्षेची वेळ: सकाळी 9.00ते दुपारी 12.00 (एकूण 180 मिनिटे).

हे ही वाचा- BARC JRF Fellowship 2026: भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधनाची संधी

NCHM JEE 2026  पात्रता आणि अर्ज शुल्क (Eligibility & Fees)

1. शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार 12 वी (HSC) उत्तीर्ण असावा किंवा 2026 च्या 12 वी परीक्षेला बसलेला असावा.
  • 12 वी मध्ये इंग्रजी (English) हा विषय असणे अनिवार्य आहे.

2. प्रवर्गनिहाय अर्ज शुल्क:

  • General / OBC (NCL): 1000/- रुपये.
  • Gen-EWS: 700/- रुपये.
  • SC / ST / PwBD / Third Gender: 450/- रुपये.

NCHM JEE 2026 परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)

  • ही परीक्षा संगणक आधारित (CBT) पद्धतीने घेतली जाईल.
  • प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.
  • यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि कल चाचणी (Aptitude) यावर आधारित प्रश्न असतील.

NCHM JEE 2026  अर्ज कसा करावा? (How to Apply Online)

1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट https://exams.nta.ac.in/NCHM/ ला भेट द्या. 2. ‘Information Bulletin’ काळजीपूर्वक वाचून ‘Online Application’ पर्यायावर क्लिक करा. 3. तुमची वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करा आणि फोटो, स्वाक्षरी अपलोड करा. 4. विहित परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Net Banking/Card/UPI) भरा.

JobsInfo.in विशेष सल्ला:

हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र केवळ जेवण बनवण्यापुरते मर्यादित नसून यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट, क्रूझ लाईन, एअरलाईन्स आणि टुरिझम अशा अनेक जागतिक संधी उपलब्ध आहेत. 12 वी नंतर लगेच प्रोफेशनल डिग्री घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा.

अशाच शैक्षणिक अपडेट्ससाठी JobsInfo.in ला आपल्या मित्रांसोबत शेअर करा!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment