---Advertisement---

NaBFID Recruitment 2026: नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटमध्ये 30 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा.

March 24, 2026 5:44 PM
NaBFID Recruitment 2026
---Advertisement---

NaBFID Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. ‘नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट‘ (NaBFID) ने सीनियर अनालिस्ट आणि व्हाईस प्रेसिडेंट श्रेणीतील विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

रिक्त पदांचा तपशील (Vacancies)

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 30 पदे भरली जाणार आहेत:

सीनियर अनालिस्ट (Senior Analyst): 25 जागा (कायमस्वरूपी/Regular).

व्हाईस प्रेसिडेंट (Vice President): 05 जागा (कंत्राटी/Contractual).

NaBFID Recruitment 2026:  पात्रता आणि वयोमर्यादा

पद श्रेणीशैक्षणिक पात्रताआवश्यक अनुभववयोमर्यादा (28.02.2026 रोजी)
सीनियर अनालिस्टपदवी/पदव्युत्तर (विशिष्ट विषयानुसार), CA, MBA Financeकिमान 4 वर्षे21 ते 40 वर्षे
व्हाईस प्रेसिडेंटपदवी/पदव्युत्तर, CA, CFA, MBA Finance किंवा समतुल्यकिमान 12 वर्षेकमाल 55 वर्षे

NaBFID Recruitment 2026:  महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • अर्ज करण्यास सुरुवात: 18 मार्च 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 एप्रिल 2026
  • ऑनलाईन परीक्षा (सीनियर अनालिस्ट): मे 2026  (संभाव्य)

हे ही वाचा- IIFCL Recruitment 2026: आयआयएफसीएलमध्ये ‘प्रबंधक’ पदांची मोठी भरती; २३ लाखांपर्यंत पॅकेज

NaBFID Recruitment 2026:  वेतन श्रेणी (Salary)

  • सीनियर अनालिस्ट: वार्षिक वेतन साधारण 24.81  लाख रुपये (निश्चित) असून यावर 20% पर्यंत व्हेरिएबल पे मिळू शकतो.
  • व्हाईस प्रेसिडेंट: उमेदवाराची पात्रता आणि अनुभवानुसार आकर्षक मोबदला दिला जाईल.

NaBFID Recruitment 2026: अर्ज शुल्क (Application Fees)

  • General/EWS/OBC: 800 रुपये + टॅक्स.
  • SC/ST/PwBD: 100 रुपये (केवळ इंटिमेशन चार्जेस) + टॅक्स. (टीप: व्हाईस प्रेसिडेंट पदासाठी अर्ज पद्धत वेगळी असल्याने अधिकृत जाहिरात पहावी )
NaBFID Recruitment 2026:  अर्ज कसा करावा?

1. सीनियर अनालिस्ट: बँकेच्या अधिकृत वेबसाईट nabfid.org/careers वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.

2. व्हाईस प्रेसिडेंट: आपला अपडेटेड बायोडाटा (CV) recruitment@nabfid.org या ईमेल आयडीवर पाठवावा. ईमेलच्या विषयात (Subject Line) “APPLICATION FOR THE POST OF <Job Code>” असे लिहिणे अनिवार्य आहे.

अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

Join WhatsApp

Join Now

Related Stories

Leave a Comment