MECL Recruitment 2026 भारत सरकारच्या खाण मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘मॅग्नेशियम एक्सप्लोरेशन अँड कन्सलटन्सी लिमिटेड‘ (MECL), नागपूर (पूर्वीचे मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड) यांनी तरुण व्यावसायिकांसाठी भरती जाहीर केली आहे. ‘निश्चित कालावधी कंत्राटी तत्त्वावर’ (FTE) विविध तांत्रिक पदांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत असून, पात्र उमेदवारांना आकर्षक मानधन दिले जाणार आहे.
MECL Recruitment 2026: रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता (Vacancy Details):
जाहिरातीनुसार एकूण 10 पदांसाठी भरती केली जाणार आहे:
यंग प्रोफेशनल (मटेरिअल्स – Materials): 02 पदे. पात्रता: मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर पदवी आणि मटेरिअल मॅनेजमेंट/प्रोक्युरमेंटमध्ये 2 वर्षांचा अनुभव.
यंग प्रोफेशनल (भूविज्ञान – Geology): 07 पदे. पात्रता: Geology/Applied Geology मध्ये M.Sc./M.Tech./M.Sc.Tech. आणि संबंधित क्षेत्रात २ वर्षांचा अनुभव.
यंग प्रोफेशनल (भूभौतिकशास्त्र – Geophysics): 01 पद. पात्रता: Geophysics मध्ये M.Sc./M.Tech./M.Sc.Tech. आणि २ वर्षांचा अनुभव.
MECL Recruitment 2026 मानधन आणि वयोमर्यादा (Salary & Age Limit):
- मासिक मानधन: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60,000/- रुपये (Consolidated) मानधन दिले जाईल.
- वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय ३५ वर्षे आहे (01.02.2026 पर्यंत).
- वयातील सवलत: SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC (NCL) उमेदवारांना 3 वर्षे सवलत मिळेल.
निवड प्रक्रिया आणि कंत्राट कालावधी:
- निवड पद्धत: उमेदवारांची निवड शैक्षणिक गुण, अनुभव आणि नागपूर येथे होणाऱ्या वैयक्तिक मुलाखतीद्वारे (Personal Interview) केली जाईल.
- कालावधी: सुरुवातीला १ वर्षासाठी नियुक्ती असेल, जी कामगिरीनुसार एकूण ३ वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.
- इतर फायदे: मानधनासोबतच उमेदवारांना PF सुविधा आणि विम्याचा हप्ता प्रतिपूर्ती (Insurance Reimbursement) देखील मिळेल.
अर्ज शुल्क आणि प्रक्रिया (How to Apply):
- अर्ज शुल्क: General, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 500/- रुपये शुल्क आहे. SC/ST/दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी शुल्क माफ आहे.
- अर्ज कसा करावा: इच्छुकांनी www.mecl.co.in या अधिकृत वेबसाईटवरील ‘Career’ पेजवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा.
MECL Recruitment 2026 महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
- ऑनलाईन अर्ज सुरू: 23 फेब्रुवारी 2026.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2026.
अर्ज करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा- https://meclrecruitment.co.in/login1.aspx
MECL ची अधिकृत जाहिरात – क्लिक करा.
महत्त्वाची टीप: अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी MECL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. मुलाखतीच्या वेळी मागील 3 महिन्यांच्या पगार स्लिप्स आणि 2 वर्षांचे ITR सोबत ठेवणे अनिवार्य आहे.





