भारत सरकारच्या खाण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या ‘मॅग्नेशियम एक्सप्लोरेशन अँड कन्सलटन्सी लिमिटेड‘ (MECL), नागपूर यांनी सन 2025-26 या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या (Apprentices) भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ‘अँप्रेंटिसशिप ॲक्ट, 1961’ नुसार एकूण 30 जागांसाठी एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
MECL Apprenticeship 2026: रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता (Vacancy Details):
ही भरती प्रामुख्याने तीन प्रवर्गात केली जाणार आहे:
- 1. ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice):
- विषय: केमिकल (Chemical), मेकॅनिकल (Mechanical), जिओफिजिस्ट (Geophysicist), जिओलॉजिस्ट (Geologist).
- पात्रता: संबंधित विषयात किमान 50% गुणांसह पदवी (B.Sc./B.E./B.Tech/B.Com/BCA).
- स्टायपेंड: दरमहा 12,300/- रुपये.
- 2. टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice):
- विषय: केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन.
- पात्रता: संबंधित विषयात किमान 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- स्टायपेंड: दरमहा 10,900/- रुपये.
- 3. ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice – ITI):
- ट्रेड: कोपा (COPA), फिटर, मेकॅनिक डिझेल, मशिनिस्ट.
- पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र.
- स्टायपेंड: दरमहा 10,560/- ते 11,040/- रुपये.
MECL Apprenticeship 2026: प्रशिक्षणाचे ठिकाण (Work Location):
निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर (महाराष्ट्र), लाछमनगड (छत्तीसगड) किंवा गोढी मल्लोई (छत्तीसगड) या प्रकल्पांवर नियुक्त केले जाईल.
अर्ज कसा करावा? (How to Apply):
- पदवी आणि डिप्लोमा धारकांसाठी: उमेदवारांनी NATS पोर्टल (https://nats.education.gov.in/) वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
- ITI ट्रेड धारकांसाठी: उमेदवारांनी Apprenticeship India पोर्टल (https://www.apprenticeshipindia.gov.in) वर अर्ज करावा.
MECL Apprenticeship 2026: महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
- ऑनलाईन नोंदणी सुरू: 24 फेब्रुवारी 2026.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 08 मार्च 2026.
अधिक माहितीसाठी: उमेदवार कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत 0712 – 2510320 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.





