---Advertisement---

MAFSU Recruitment 2026: महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत 175 जागांसाठी महाभरती;

March 1, 2026 8:28 PM
MAFSU Recruitment 2026
---Advertisement---

MAFSU Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU) अंतर्गत विविध शिक्षकेत्तर रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे गट ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ मधील एकूण 175 जागा भरल्या जाणार आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील सविस्तर माहिती वाचून अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा.

MAFSU Recruitment 2026 भरतीचा थोडक्यात तपशील

  • संस्थेचे नाव: महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
  • पदाचे नाव: शिक्षकेत्तर गट ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ मधील विविध पदे.
  • एकूण रिक्त पदे: 175 पदे.
  • नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र (नागपूर मुख्यालय आणि इतर उपकेंद्र).
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 28 फेब्रुवारी 2026.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2026.

MAFSU Recruitment 2026 रिक्त पदांचा तपशील

विद्यापीठाने विविध 35 संवर्गातील पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पदनिहाय वेतनश्रेणी आणि जागा खालीलप्रमाणे आहेत:

अ. क्र.पदाचे नाववेतनश्रेणी (पे-लेव्हल)एकूण पदे
गट “ब” पदे
1अधिदान व लेखाधिकारीएस-15 (₹41800 – 132300)01
2सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक (पशुवैद्यकीय)एस-15 (₹41800 – 132300)03
3अधिष्ठाता यांचे तांत्रिक अधिकारी (पशुवैद्यक शास्त्र)एस-15 (₹41800 – 132300)02
4रुग्णालय चिकित्सकएस-15 (₹41800 – 132300)02
5सहाय्यक व्यवस्थापक (गुण नियंत्रण)एस-14 (₹38600 – 122800)01
6प्लांट ऑपरेटर (दुग्ध प्रक्रिया)एस-14 (₹38600 – 122800)01
गट “क” पदे
7शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ (OT Technician)एस-10 (₹29200 – 92300)02
8वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यकएस-10 (₹29200 – 92300)01
9दुग्धशाळा सहाय्यकएस-8 (₹25500 – 81100)01
10क्ष-किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician)एस-8 (₹25500 – 81100)03
11पशुचिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक (VLDA)एस-8 (₹25500 – 81100)08
12रुग्णालय तंत्रज्ञएस-8 (₹25500 – 81100)01
13शस्त्रक्रियागृह सहाय्यकएस-8 (₹25500 – 81100)04
14प्रक्षेत्र सहाय्यकएस-8 (₹25500 – 81100)03
15वरिष्ठ लिपिक (Senior Clerk)एस-8 (₹25500 – 81100)14
16वरिष्ठ यांत्रिकएस-8 (₹25500 – 81100)01
17बॉयलर ऑपरेटरएस-8 (₹25500 – 81100)01
18प्राणीसंग्रहालय तंत्रज्ञ (क्युरेटर)एस-7 (₹21700 – 69100)02
19क्युरेटर कम स्पेसिमन टेक्निशियनएस-7 (₹21700 – 69100)02
20प्रयोगशाळा सहाय्यक (पशुवैद्यकीय व दुग्ध तंत्रज्ञान)एस-7 (₹21700 – 69100)08
21प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य विज्ञान)एस-7 (₹21700 – 69100)04
22कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यकएस-7 (₹21700 – 69100)01
23औषध भांडारपालएस-6 (₹19900 – 63200)02
24वाहन चालक / रुग्णवाहिका चालकएस-6 (₹19900 – 63200)07
25कनिष्ठ यांत्रिक (यांत्रिकी व शितकरण)एस-6 (₹19900 – 63200)01
26ग्रंथालय परिचरएस-6 (₹19900 – 63200)06
27प्रयोगशाळा परिचरएस-6 (₹19900 – 63200)41
28ट्रॅक्टर ड्रायव्हर / मशीन ऑपरेटरएस-6 (₹19900 – 63200)03
28व्रणोपचारकएस-6 (₹19900 – 63200)02
30लिपिक नि टंकलेखक (Clerk cum Typist)एस-6 (₹19900 – 63200)37
31कनिष्ठ भांडारपालएस-6 (₹19900 – 63200)03
32विजतंत्री (Electrician)एस-6 (₹19900 – 63200)01
33विस्तार प्रशिक्षण व प्रदर्शन सहाय्यकएस-6 (₹19900 – 63200)02
गट “ड” पदे
34कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तारतंत्रीएस-3 (₹16600 – 52400)02
35पशुधन सहाय्यकएस-3 (₹16600 – 52400)02
एकूण रिक्त पदे175

MAFSU Recruitment 2026 पात्रता आणि वयोमर्यादा

  • शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदासाठी पात्रता निकष वेगळे आहेत. यामध्ये पदवी (Degree), पदविका (Diploma) किंवा संबंधित क्षेत्रातील तांत्रिक कौशल्याची अट आहे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा.
  • वयोमर्यादा (20 मार्च 2026 रोजी):
    • किमान वयोमर्यादा: 18 वर्षे.
    • अराखीव (खुला) प्रवर्ग: 38 वर्षे.
    • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 43 वर्षे.
    • दिव्यांग: 45 वर्षे.
    • अंशकालीन कर्मचारी: 55 वर्षे.
    • प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त: 45वर्षे.

परीक्षा शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग: 1000 रुपये.
  • मागासवर्गीय/EWS/अनाथ/दिव्यांग: 900 रुपये.
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक: शुल्क माफ.
  • टीप: शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून ते ना-परतावा (Non-Refundable) आहे.

निवड प्रक्रिया (Selection Process)

1. उमेदवारांची निवड संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेतील (CBT) गुणांच्या आधारे केली जाईल. 2. कोणत्याही पदासाठी मुलाखती (Interview) घेतल्या जाणार नाहीत. 3. वाहन चालक किंवा तांत्रिक पदांसाठी ऑनलाईन परीक्षेसोबतच कौशल्य चाचणी (Skill Test) घेतली जाईल आणि दोन्हीचे गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी तयार होईल. 4. पात्र होण्यासाठी उमेदवारांना परीक्षेत किमान 45% गुण मिळवणे अनिवार्य आहे.

अर्ज कसा करावा? (How to Apply)

  • पात्र उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट www.mafsu.ac.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची मुदत 25 फेब्रुवारी 2026 ते 20 मार्च 2026 पर्यंत आहे.
  • अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र (Domicile), जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • टपालाने किंवा हस्तबटवड्याने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्वाची लिंक:

jobsinfo.in वर अशाच नवनवीन नोकरी अपडेट्ससाठी आमच्या पोर्टलला नियमित भेट द्या!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment