IRCTC भरती 2026: भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) अंतर्गत ‘हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स’ (Hospitality Monitors) या पदांच्या 43 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नसून केवळ थेट मुलाखतीद्वारे (Walk-in-Interview) पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
IRCTC भरती 2026: महत्त्वाचे तपशील
| तपशील | माहिती |
| संस्था | IRCTC (दक्षिण मध्य विभाग) |
| पदाचे नाव | हॉस्पिटॅलिटी मॉनिटर |
| एकूण पदे | 43 जागा |
| पगार (CTC) | 30000 रुपये प्रति महिना |
| मुलाखतीची तारीख | 12 आणि 13 मार्च 2026 |
| मुलाखतीची वेळ | सकाळी 10.30ते संध्याकाळी 5.30 |
IRCTC भरती 2026 शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा :
- शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून B.Sc. (Hospitality and Hotel Administration) किंवा BBA/MBA (Culinary Arts) किंवा M.B.A (Tourism and Hotel Management) उत्तीर्ण असावा.
- अनुभव: संबंधित शैक्षणिक पात्रता असलेले फ्रेशर्स (Freshers) उमेदवार अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी (UR) कमाल वय 27 वर्षे असावे (०१.०१.२०२६ रोजी).
- सवलत: SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि दिव्यांगांसाठी 10 वर्षांची सवलत लागू असेल.
पगार आणि इतर फायदे (Salary & Allowances):
- मासिक वेतन: 30,000 रुपये (कंत्राटी तत्त्वावर).
- दैनिक भत्ता: कामावर असताना दररोज 350 रुपये.
- मुक्काम भत्ता: रात्रीच्या मुक्कामासाठी 240 रुपये.
- वैद्यकीय विमा: वयोगटानुसार 1400 ते 2000 रुपये प्रति महिना विमा संरक्षण.
IRCTC भरती 2026 कामाचे स्वरूप (Scope of Work):
निवड झालेल्या उमेदवारांना वंदे भारत, मेल, एक्स्प्रेस आणि टुरिस्ट ट्रेन्समध्ये अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सेवांचे निरीक्षण करावे लागेल. तसेच बेस किचन आणि पँट्री मधील कामावर नियंत्रण ठेवणे आणि प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करणे ही मुख्य जबाबदारी असेल.
मुलाखतीचा पत्ता (Interview Venue):
IRCTC, दक्षिण मध्य विभाग, झोनल ऑफिस, 1 ला मजला, ऑक्सफर्ड प्लाझा, सरोजिनी देवी रोड, सिकंदराबाद – 500003.
अर्ज कसा करावा? (How to Apply):
1. उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरून सोबत ठेवावा. 2. अर्जासोबत सर्व मूळ कागदपत्रे (Original Documents), त्यांची साक्षांकित प्रत आणि २ अलीकडील पासपोर्ट फोटो मुलाखतीच्या दिवशी सोबत आणावेत. 3. निवड प्रक्रिया केवळ मुलाखतीवर आधारित असेल.
महत्त्वाची टीप: ही भरती पूर्णपणे 2 वर्षांच्या कंत्राटी करारावर आधारित असून कामगिरीनुसार ती पुढे 1 वर्षासाठी वाढवली जाऊ शकते.
रेल्वे नोकरीच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला नक्की फॉलो करा.




