Indian Coast Guard Recruitment 2026: देशसेवेची ओढ असलेल्या आणि भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) करिअर करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तटरक्षक दलाने ‘नाविक’ (General Duty) आणि ‘यांत्रिक’ पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
पदांचा तपशील (Vacancy Details):
१. नाविक (General Duty): या पदासाठी उमेदवार 12 वी (गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. यांत्रिक (Yantrik): 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित शाखेतील (Electrical/Mechanical/Electronics) डिप्लोमा आवश्यक.
Indian Coast Guard Recruitment 2026: वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 22 वर्षे असावे. (राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल).
निवड प्रक्रिया कशी असेल? (Selection Process)
भारतीय तटरक्षक दलातील या पदांसाठी उमेदवारांची निवड खालील तीन टप्प्यांत केली जाईल:
- टप्पा १: संगणक आधारित लेखी परीक्षा (Computer Based Test – CBT).
- टप्पा २: शारीरिक क्षमता चाचणी (Physical Fitness Test – PFT).
- टप्पा ३: वैद्यकीय तपासणी (Medical Examination).
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
उमेदवारांनी खालील तारखांच्या आत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे:
- अर्ज भरण्यास सुरुवात: ४ मार्च २०२६.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ मार्च २०२६ (संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत).
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर (joinindiancoastguard.cdac.in) जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
अधिकृत माहिती आणि लिंक्स:
- अधिकृत जाहिरात (Notification PDF): येथे क्लिक करा (तटरक्षक दलाच्या भरती पोर्टल)
- ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक: Apply Online
- अधिकृत संकेतस्थळ:joinindiancoastguard.cdac.in





