---Advertisement---

Indian Bank Recruitment 2026 इंडियन बँकेत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या मोठ्या भरतीला सुरुवात; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

April 13, 2026 3:40 PM
Indian Bank Recruitment 2026
---Advertisement---

Indian Bank Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. इंडियन बँकेने (Indian Bank) 2026-27 या वर्षासाठी स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे विविध विभागांमध्ये तंत्रज्ञान, क्रेडिट आणि फायनान्स तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवात: 8 एप्रिल 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2026
  • अर्ज शुल्क भरण्याची मुदत: 8 एप्रिल ते 28 एप्रिल 2026.

रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)

एकूण रिक्त पदांपैकी काही प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:

  • IT विभाग: व्यवस्थापक (DC ऑपरेशन्स, माहिती सुरक्षा, API डेव्हलपर, डेटा अनॅलिस्ट).
  • क्रेडिट विभाग: वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक (क्रेडिट).
  • फायनान्स विभाग: चार्टर्ड अकाउंटंट, वरिष्ठ व्यवस्थापक (फायनान्स/फायनान्शिअल अनॅलिस्ट).
  • इतर पदे: व्यवस्थापक (HR, मार्केटिंग), सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा, सिव्हिल इंजिनिअर, आर्किटेक्ट).

पात्रता निकष (Eligibility Criteria)

  • वयोमर्यादा: किमान वय 23 ते कमाल 45 वर्षांपर्यंत (पदांनुसार वेगवेगळे).
  • वयोमर्यादेत सवलत: SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC उमेदवारांना 3वर्षे आणि PwBD उमेदवारांना 10 वर्षांपर्यंत सवलत मिळेल.
  • शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात पदवी (Engineering), PG, MBA, CA, CFA किंवा ICMA पात्रता असणे आवश्यक आहे.
  • अनुभव: बहुतांश पदांसाठी संबंधित क्षेत्रातील 1 ते 5 वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे.

Indian Bank Recruitment 2026 निवड प्रक्रिया (Selection Process)

बँकेच्या निर्णयानुसार निवड प्रक्रिया खालीलपैकी एका पद्धतीने होईल:

1. अर्जांची शॉर्टलिस्टिंग आणि थेट मुलाखत.

2. लेखी परीक्षा (Written/Online Test) आणि त्यानंतर मुलाखत.

हे देखील वाचा- भारतीय रेल्वेत 11,127 पदांची मेगाभरती

अर्ज शुल्क (Application Fee)

  • SC / ST / PwBD उमेदवारांसाठी: 175 रुपये (केवळ सूचना शुल्क).
  • इतर सर्व उमेदवारांसाठी: 1000 रुपये (GST सह).
Indian Bank Recruitment ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply)

1. सर्वप्रथम इंडियन बँकेच्या www.indianbank.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

2. ‘Careers’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Recruitment of Specialist Officers – 2026’ वर क्लिक करा.

3. ‘New Registration’ वर क्लिक करून आपली माहिती भरा.

4. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

5. ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

महत्वाची टीप: उमेदवाराने केवळ एकाच पदासाठी अर्ज करावा, एकापेक्षा जास्त केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अधिकृत माहितीसाठी बँकेची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment