EIL Recruitment 2026: तुम्ही इंजिनिअरिंग पदवीधर आहात आणि सरकारी नोकरी शोधत आहात? तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. भारत सरकारच्या मालकीच्या इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) ने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवारांची निवड GATE-2026 मधील कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे.
महत्त्वाचे तपशील (EIL MT Recruitment Details):
- पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee – Construction / Other than Construction).
- पात्र शाखा: केमिकल (Chemical), मेकॅनिकल (Mechanical), सिव्हिल (Civil) आणि इलेक्ट्रिकल (Electrical).
- शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात किमान 65% गुणांसह बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी. इंजिनिअरिंग पदवी.
- पात्र वर्ष: केवळ 2025 आणि 2026 मध्ये उत्तीर्ण होणारे किंवा होणारे विद्यार्थीच अर्ज करू शकतात. 2024 किंवा त्यापूर्वीचे उमेदवार पात्र नाहीत.
वेतन आणि फायदे (Salary & CTC):
- प्रशिक्षण कालावधी: 1 वर्ष.
- स्टायपेंड: प्रशिक्षणादरम्यान दरमहा ₹60,000 + निवास आणि वाहतूक भत्ता (किंवा अतिरिक्त ₹15,000) दिले जातील.
- वार्षिक पॅकेज (CTC): यशस्वी रित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, कन्स्ट्रक्शन विभागासाठी वार्षिक साधारण ₹21.00 लाख आणि इतर विभागांसाठी ₹20.10 लाख पर्यंत पॅकेज मिळेल.
- पे स्केल: ₹60000 – ₹180000.
हे ही वाचा- NHPC भरती 2026 : 72 प्रशिक्षणार्थी अभियंता पदांची मेगा भरती; 15 ते 16 लाख वार्षिक पॅकेज
वयोमर्यादा (Age Limit as on 01.07.2026):
- सामान्य (General): 25 वर्षे.
- ओबीसी (OBC-NCL): 28 वर्षे.
- एससी/एसटी (SC/ST): 30 वर्षे.
- दिव्यांग (PWD): 35 ते 40 वर्षांपर्यंत सूट.
EIL Recruitment 2026: निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड प्रामुख्याने GATE-2026 स्कोअरच्या आधारे केली जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना गट चर्चा (Group Discussion) आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी (Personal Interview) दिल्ली किंवा गुरुग्राम येथे बोलावले जाईल.
अर्ज कसा करावा? (How to Apply):
1. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईट www.engineersindia.com वर जा. 2. ‘Careers’ किंवा ‘Recruitment’ सेक्शनमध्ये ‘Management Trainee’ लिंकवर क्लिक करा. 3. उमेदवाराने आपला GATE-2026 रजिस्ट्रेशन नंबर अचूक भरणे अनिवार्य आहे. 4. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क (Application Fee) आकारले जाणार नाही.
EIL Recruitment 2026: महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 मार्च 2026 (सकाळी ००:०० पासून).
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 एप्रिल 2026 (रात्री 11.59 पर्यंत).
- अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा- लिंक
- अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी उमेदवार rectt@eil.co.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.







