Bank of Baroda Recruitment 2026: जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल आणि तुमच्याकडे संबंधित कामाचा अनुभव असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विभागात विविध पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर भरती जाहीर केली आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १०४ जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
Bank of Baroda Recruitment 2026: पदांचे नाव आणि रिक्त जागा
बँक ऑफ बडोदाने खालील चार पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे:
1. AVP II – ग्रुप हेड (Group Head): 04 जागा
2. AVP II – टेरिटरी हेड (Territory Head): 17 जागा
3. डेप्युटी मॅनेजर – सीनियर रिलेशनशिप मॅनेजर: 70 जागा
4. डेप्युटी मॅनेजर – वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट: 13 जागा
Bank of Baroda Recruitment 2026: पात्रता आणि वयोमर्यादा
1. शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी.
- व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (MBA/PGDM) असल्यास प्राधान्य दिले जाईल.
2. कामाचा अनुभव:
- विविध पदांसाठी किमान 3 ते 10 वर्षांपर्यंतचा बँकिंग किंवा वेल्थ मॅनेजमेंट क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
3. वयोमर्यादा (1 मार्च 2026 रोजी):
- पदांनुसार किमान वय 24 ते 31 वर्षे आणि कमाल वय 35 ते 45 वर्षांपर्यंत असावे. सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
हे ही वाचा- 12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअरची संधी! NCHM JEE 2026 परीक्षेसाठी नोंदणी सुरू
Bank of Baroda Recruitment 2026: अर्ज शुल्क
- General, EWS आणि OBC उमेदवार: 850/- रुपये.
- SC, ST, PWD आणि महिला उमेदवार: 175/- रुपये.
निवड प्रक्रिया (Selection Process)
उमेदवारांची निवड प्रामुख्याने अर्जांची छाननी (Scrutiny) आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे (Personal Interview) केली जाईल. अर्जांची संख्या जास्त असल्यास बँक ऑनलाईन परीक्षा किंवा इतर चाचण्या घेऊ शकते.
Bank of Baroda Recruitment 2026: अर्ज कसा करावा?
1. बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.in/Career.htm ला भेट द्या. 2. ‘Current Opportunities’ विभागातील संबंधित जाहिरातीवर क्लिक करा. 3. सर्व आवश्यक माहिती भरा आणि बायो-डेटा, फोटो, स्वाक्षरी अपलोड करा. 4. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
महत्त्वाची टीप: उमेदवाराचा CIBIL स्कोअर किमान 680 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.





