Arogya Vibhag Recruitment 2026: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात करिअर करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. ‘वैद्यकीय अधिकारी, गट-अ’ (Medical Officer, Group-A) या संवर्गातील एकूण १४४० रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
इच्छुक उमेदवारांनी खालील सविस्तर माहिती वाचून विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावा.
Arogya Vibhag Recruitment 2026 भरतीचा थोडक्यात तपशील
- संस्थेचे नाव: सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन.
- पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (MBBS आणि विशेषज्ञ).
- एकूण पदे: १४४० जागा.
- अर्ज पद्धती: ऑनलाईन.
- अर्ज सुरू होण्याची तारीख: २७ फेब्रुवारी २०२६.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० मार्च २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत).
Arogya Vibhag Recruitment 2026 रिक्त पदांचा तपशील
एकूण १४४० पदांची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली आहे:
| संवर्ग | पदसंख्या |
| एमबीबीएस (MBBS) | ७६६ |
| विशेषज्ञ (Specialists) | ६७४ |
| एकूण | १४४० +2 |
विशेषज्ञ पदांमध्ये स्त्रीरोगतज्ञ (१६७), बालरोगतज्ञ (१२२), सर्जन (३३), भूलतज्ञ (३४०) आणि रक्त संक्रमण अधिकारी (१२) यांचा समावेश आहे.
वेतनश्रेणी (Salary Structure)
निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार एस-२० (रु. ५६,१०० – १,७७,५००) या स्तरावरील वेतन आणि इतर शासकीय भत्ते मिळतील.
Arogya Vibhag Recruitment 2026 पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility Criteria)
- शैक्षणिक पात्रता:
- MBBS पदासाठी: एमबीबीएस पदवी किंवा समकक्ष अर्हता.
- विशेषज्ञ पदासाठी: संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका (MD/MS/Diploma/DNB).
- उमेदवाराची आंतरवासिता (Internship) पूर्ण असावी आणि NMC/MMC कडे नोंदणी असणे अनिवार्य आहे.
- वयोमर्यादा (२० मार्च २०२६ रोजी):
- खुल्या प्रवर्गासाठी (अमागास): १८ ते ३८ वर्षे.
- मागासवर्गीय/आ.दु.घ. (EWS): १८ ते ४३ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार: कमाल ४५ वर्षांपर्यंत.
- खेळाडू / अनाथ उमेदवार: ४३ वर्षांपर्यंत.
अर्ज शुल्क (Application Fee)
- अराखीव (खुला) प्रवर्ग: १००० रुपये.
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ७०० रुपये.
Arogya Vibhag Recruitment 2026 निवड प्रक्रिया (Selection Process)
उमेदवारांची निवड गुणांच्या मूल्यांकनाद्वारे (Weightage) केली जाईल:
- पदवी परीक्षेचे गुण: ५० गुण (टक्केवारीनुसार).
- उच्च शिक्षण (PG Degree/Diploma): २० गुण.
- शासकीय सेवेतील अनुभव: ३० गुण (कमाल).
- आदिवासी/नक्षलग्रस्त भागात काम केल्यास प्रत्येक ११ महिन्यांच्या सेवेसाठी १० गुण.
- बिगर-आदिवासी भागात प्रत्येक ११ महिन्यांच्या सेवेसाठी ५ गुण मिळतील.
अर्ज कसा करावा? (How to Apply)
- उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
- अर्जासोबत अधिवास (Domicile), जन्म दाखला, पदवी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमिलेअर (लागू असल्यास) ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
- टपालाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अधिकृत जाहिरात पहा: येथे क्लिक करा




