महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO), कराड विभाग अंतर्गत ‘विजतंत्री‘ (Electrician) या ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवारांची (Apprentice) भरती जाहीर करण्यात आली आहे. सत्र 2026 साठी एकूण 39 जागा भरल्या जाणार असून, सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.
महापारेषण भरती 2026: महत्त्वाचे तपशील (Job Highlights)
| तपशील | माहिती |
| संस्था | महापारेषण (MAHATRANSCO), कराड विभाग |
| पदाचे नाव | शिकाऊ उमेदवार (विजतंत्री / Electrician) |
| एकूण पदे | 39 जागा |
| शिक्षण | 10 वी उत्तीर्ण + ITI (विजतंत्री) |
| वयोमर्यादा | 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीयांना ५ वर्षे सूट) |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 मार्च 2026 (रात्री 23.59 पर्यंत) |
| अधिकृत वेबसाईट | www.mahatransco.in |
महापारेषण भरती 2026 पात्रता आणि अटी (Eligibility Criteria)
- शैक्षणिक पात्रता: उमेदवार 10 वी (SSC) उत्तीर्ण असावा आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) मान्यताप्राप्त ITI मधून ‘विजतंत्री’ (Electrician) ट्रेडमध्ये उत्तीर्ण असावा.
- ट्रेडची अट: केवळ विजतंत्री (Electrician) ट्रेडच्या उमेदवारांनीच अर्ज करावा. डिप्लोमा, व्होकेशनल किंवा वायरमन कोर्स केलेल्या उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- प्रशिक्षण कालावधी: निवड झालेल्या उमेदवारांना २ वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल.
- विद्यावेतन (Stipend): शासनाच्या नियमाप्रमाणे दरमहा विद्यावेतन दिले जाईल.
महापारेषण भरती 2026 निवड प्रक्रिया (Selection Process)
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड खालील निकषांवर केली जाईल:
- १० वी चे गुण (५०%) आणि ITI चे गुण (५०%) यानुसार गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल.
- सातारा जिल्ह्यातील उमेदवारांना निवडीमध्ये प्राधान्य दिले जाईल.
- कागदपत्र पडताळणीनंतर पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply Online)
इच्छुक उमेदवारांनी खालील स्टेप्स फॉलो करून अर्ज करावा:
- सर्वप्रथम www.apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर नोंदणी करा.
- नोंदणी करताना ‘EHV O&M DIVISION, KARAD’ सर्च करा किंवा स्थापना नोंदणी क्रमांक E03212700871 वापरा.
- अर्जासोबत 10 वी ची गुणपत्रिका, ITI गुणपत्रिका, आधार कार्ड, फोटो आणि जातीचा दाखला सुस्पष्टपणे अपलोड करा.
- अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २६ मार्च २०२६ आहे.
कागदपत्रे अपलोड करताना घ्यायची काळजी:
- फोटो आणि मूळ प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी सुस्पष्ट असावी.
- 10 वी, ITI गुणपत्रिका आणि आधार कार्डवरील नाव एकसारखे (सुसंगत) असावे.
- कार्यान्वित असलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर अर्जात नमूद करणे अनिवार्य आहे.




