महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण), विभाग सांगली अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 नुसार सत्र 2026 साठी ‘वीजतंत्री‘ (Electrician) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तांत्रिक शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना सरकारी कंपनीत कामाचा अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.
महापारेषण भरतीचे मुख्य तपशील (Key Highlights):
- पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार – वीजतंत्री (Apprentice – Electrician).
- एकूण रिक्त जागा: 37 पदे.
- प्रशिक्षण कालावधी: 1 वर्ष.
- वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सवलत).
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2026 (रात्री 23.59 पर्यंत).
महापारेषण भरती शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.
- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त ITI संस्थेतून ‘वीजतंत्री‘ (Electrician) या विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
महापारेषण भरती आरक्षण तक्ता (Reservation Table):
एकूण ३७ जागांचे प्रवर्गनिहाय वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:
- खुला प्रवर्ग (UR): 9जागा
- इमाव (OBC): 7 जागा
- आदुघ (EWS): 4 जागा
- साशैमाप्र (SEBC): 4 जागा
- अजा (SC): 5 जागा
- अज (ST): 3 जागा
- इतर प्रवर्ग (VJ-A/NT): 5 जागा
अर्ज कसा करावा? (How to Apply Online):
इच्छुक उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करावा:
- भारत सरकारच्या www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- पोर्टलवर ‘EHV O&M DIVISION, SANGLI’ हे लोकेशन निवडा किंवा स्थापना नोंदणी क्रमांक E09162700112 सर्च करून त्यावर अर्ज करा.
- अर्जासोबत 10वी ची गुणपत्रिका, ITI चे सर्व सेमिस्टरचे निकाल, आधार कार्ड, फोटो आणि स्वाक्षरी सुस्पष्टपणे स्कॅन करून अपलोड करा.
महत्त्वाच्या सूचना:
- कागदपत्रे: 10 वी, ITI च्या गुणपत्रिकेवरील नाव आणि आधार कार्डवरील नाव सुसंगत असावे.
- संपर्क: अर्जात सध्या सुरू असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी देणे बंधनकारक आहे.
- नोकरीचा हक्क: शिकाऊ उमेदवारी पूर्ण केल्यामुळे कंपनीत कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याचा कोणताही हक्क उमेदवाराला प्राप्त होत नाही.
- निवास व्यवस्था: प्रशिक्षण कालावधीत राहण्याची कोणतीही सोय कंपनीकडून केली जाणार नाही.
सविस्तर माहितीसाठी कंपनीच्या www.mahatransco.in या संकेतस्थळाला भेट द्या.




