---Advertisement---

नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड (NCL) मध्ये २७० जागांसाठी भरती

February 26, 2026 11:07 AM
---Advertisement---

केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘मिनिरत्न’ नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये (NCL) तांत्रिक कौशल्य असलेल्या तरुणांसाठी भरती होत आहे. असिस्टंट फोरमन (ग्रेड-सी) या पदासाठी तब्बल २७० रिक्त जागांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

NCLपदांचा सविस्तर तपशील

एनसीएलमधील तांत्रिक विभागांत उमेदवाराची ‘असिस्टंट फोरमन (ट्रेनी)’ म्हणून नियुक्ती केली जाईल:

  • इलेक्ट्रिकल: १४८ जागा
  • मेकॅनिकल: १०८ जागा
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन(E&T): १४ जागा

पात्रता आणि वयोमर्यादा

इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील किमान ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा त्यापेक्षा उच्च तांत्रिक शिक्षण असणे अनिवार्य आहे. अर्जदाराचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. नियमानुसार SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षे वयात सवलत देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया आणि परीक्षा स्वरूप

उमेदवारांची निवड १०० गुणांच्या संगणक आधारित परीक्षेतील(CBT) गुणांवर होईल. परीक्षेत दोन विभाग असतील:

१. तांत्रिक विभाग (७०गुण): संबंधित इंजिनिअरिंग विषयावर आधारित प्रश्न.

२. सामान्य विभाग (३०गुण): सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित. महत्त्वाची बाब म्हणजे या परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण(Negative Marking) असणार नाहीत.

पगार आणि भत्ते

निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात दरमहा ४७,३३०.२५ मूळ वेतन मिळेल. याशिवाय DA, घरभाडे भत्ता, हजेरी बोनस आणि वैद्यकीय सुविधा देखील पुरवल्या जातील.

अर्ज कसा आणि कधी करावा?

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ५ मार्च २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत).
  • अर्ज शुल्क: खुल्या आणि OBC प्रवर्गासाठी ₹११८०, तर SC/ST/दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे.
  • अधिकृत वेबसाइट: www.nclcil.in.
  • अर्ज करण्यासाठी लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/97756/Index.html

तरुणांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीने अर्ज करावा. ही एक उत्कृष्ट सरकारी नोकरी असून करिअरच्या दृष्टीने मोठी संधी आहे.

Join WhatsApp

Join Now

Related Stories

Leave a Comment