महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणार-या जलसंपदा विभागामध्ये Water Resources Department सरळसेवा भरती होत आहे. जलसंपदा विभागाच्या सात परिमंडळांमध्ये ४४९७ जागा भरल्या जाणार आहेत. गट-ब (अ राजपत्रित) व गट-क संवर्गातील पदांकरिता ही भरती होणार आहे. चांगला पगार आणि सुरक्षित भविष्याची हमी यामुळे तरुणांचा या भरतीकडे कल असतो. या भरतीची तपशीलवार माहिती आपण पाहणार आहोत.
Vacancy in Water Resources Department, Gov of Maharashtra
जलसंपदा विभागांतर्गत सात परिमंडळांतील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील एकूण ४,४९७ पदांची सरळसेवा भरती होत आहे. एकूण १४ संवर्गासाठी ही भरती होणार आहे.
संवर्गातील पदे , पात्रता, वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी Post, eligibility, age limit and salary
पद | पात्रता | वेतनश्रेणी | वयोमर्यादा | एकूण पदे | परिमंडल |
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट–ब) | भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ भूगर्भ शास्त्र/ कृषी (मृद शास्त्र)/ कृषी (रसायनशास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी | एस – १६ (रु. ४४,९०० – १,४२,४००) | खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे; मागासवर्गीय/ खेळाडू – १८ ते ४५ वर्षे; माजी सैनिक/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/ दिव्यांग – ४७ वर्षे; अंशकालीन पदवीधारक – ५७ वर्षे. | 4 | नाशिक – २, पुणे – २ |
निम्न श्रेणी लघुलेखक (गट–ब) | (i) १० वी उत्तीर्ण, (ii) लघु लेखनाचा वेग १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. | एस – १५ (रु. ४१,८०० – १,३२,३०० | 19 | अमरावती – 3, छत्रपती संभाजी नगर – 6, सातारा – १, नागपूर – २, नाशिक – 1 पुणे – 3, ठाणे – 3 | |
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक | भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ भूगर्भ शास्त्र/ कृषी (मृद शास्त्र)/ कृषी (रसायनशास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी | एस – १५ (रु. ४१,८०० – १,३२,३००) | 5 | नाशिक | |
भूवैज्ञानिक सहाय्यक | भूगर्भ शास्त्र/ अॅप्लाईड जीऑलॉजी विषयातील पदवी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण किंवा माईन्स (भारतीय खणीकर्म), धनबाद येथील भूगर्भ शास्त्र उपयोजित भूगर्भ शास्त्र पदविका किंवा समकक्ष अर्हता. | एस – १४ (रु. ३८,६०० – १,२२,८००) | 5 | नाशिक | |
आरेखक | स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य, यांत्रिकी, विद्याुत अभियांत्रिकी पदविका आणि शासकीय, निमशासकीय कार्यालयातील सहाय्यक आरेखक पदावरील कामाचा ३ वर्षांचा अनुभव. | एस – १० (रु. २९,२०० – ९२,३००) | 25 | अमरावती – ३, छत्रपती संभाजी नगर – ५, सातारा – ५, नागपूर – ३, नाशिक – १, पुणे – ६, ठाणे – २ | |
सहाय्यक आरेखक | स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी पदविका. | एस – ८ (रु. २५,५०० – ८१,१००) | 60 | अमरावती – ८, छत्रपती संभाजी नगर – १३, सातारा – ७, नागपूर – १४, पुणे – ११, ठाणे – ७ | |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | (i) १० वी उत्तीर्ण, (ii) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ सिव्हील व रुरल इंजिनाअरिंग पदविका/ सिव्हील व रुरल कन्स्ट्रक्शन पदविका/ ट्रान्सपोर्टेशन पदविका/ कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी पदविका किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी. | एस – ८ (रु. २५,५०० – ८१,१००) | 1528 | अमरावती – 103, छत्रपती संभाजी नगर – 432, सातारा – 260 नागपूर – 109, नाशिक – 195, पुणे – 273, ठाणे – 156 | |
प्रयोगशाळा सहाय्यक | भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ भूगर्भशास्त्र/ कृषी शाखा या विषयातील पदवी उत्तीर्ण. | एस – ७ (रु. २१,७०० – ६९,१००) | 35 | नाशिक – 33 पुणे – 2 | |
अनुरेखक | (i) १० वी उत्तीर्ण, (ii) आरेखक स्थापत्य हा आय्टीआय्चा अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा शासन मान्यताप्राप्त कला/ रेखाचित्र विद्यालयाची कलाशिक्षक पदविका. | एस – ७ (रु. २१,७०० – ६९,१००) | 284 | अमरावती – 21, छत्रपती संभाजी नगर – 68, सातारा – 38, नागपूर – 31, नाशिक – 33, पुणे – 59, ठाणे – 34 | |
दप्तर कारकुन | (i) पदवी (कोणतीही शाखा), (ii) टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा ३० श.प्र.मि. मराठी किंवा ४० श.प्र.मि. इंग्रजी उत्तीर्ण. | एस – ६ (रु. १९,९०० – ६३,२००) | ४३० | अमरावती – 9, छत्रपती संभाजी नगर – 134, सातारा – 49, नागपूर – 76, नाशिक – 35, पुणे – 113, ठाणे – 14 | |
मोजणीदार | (i) पदवी (कोणतीही शाखा), (ii) टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा ३० श.प्र.मि. मराठी किंवा ४० श.प्र.मि. इंग्रजी उत्तीर्ण. | एस – ६ (रु. १९,९०० – ६३,२००) | ७५८ | अमरावती – 42, छत्रपती संभाजी नगर – 236, सातारा – 98, नागपूर – 57, नाशिक – 88, पुणे – 207, ठाणे – 30 | |
कालवा निरीक्षक | (i) पदवी (कोणतीही शाखा), (ii) टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा ३० श.प्र.मि. मराठी किंवा ४० श.प्र.मि. इंग्रजी उत्तीर्ण. | एस – ६ (रु. १९,९०० – ६३,२००) | १,१८९ | अमरावती – ५९, छत्रपती संभाजी नगर – ३८८, सातारा – १५३, नागपूर – १००, नाशिक – १२४, पुणे – ३१९, ठाणे – ४६ | |
सहाय्यक भांडारपाल | (i) पदवी (कोणतीही शाखा), (ii) टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा ३० श.प्र.मि. मराठी किंवा ४० श.प्र.मि. इंग्रजी उत्तीर्ण. | एस – ६ (रु. १९,९०० – ६३,२००) | १३८ | अमरावती – ९, छत्रपती संभाजी नगर – ३५, सातारा – २२, नागपूर – २२, नाशिक – १३, पुणे – १९, ठाणे – १८ | |
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक | भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित/ इंग्रजी विषयांसह १२ वी उत्तीर्ण किंवा आयटीआयचा भूमापक (सर्वेक्षक) अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी शाखेतील पदविकाधारकाला प्राधान्य देण्यात येईल. | एस – ६ (रु. १९,९०० – ६३,२००) | 8 | पुणे |
Procedure of recruitment 2023
निवड पद्धती : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा ही ऑनलाइन (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट). प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. (सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार नाहीत.)
दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक/ सहाय्यक भांडारपाल या पदांसाठी एकूण १०० प्रश्नांची परीक्षा असेल त्यासाठी २०० गुण असणार आहेत तर दोन तासांचा वेळ म्हणजे १२० मिनिटांचा कालावधी असणार आहे. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक विषयांचे प्रत्येकी २५ प्रश्न विचारले जातील.
कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून या पदांसाठी एकत्रित परीक्षा होणार आहे. त्यामुळे या पदांसाठी एकच अर्ज भरावा लागणार आहे. वरिल पदांसाठी अर्ज सादर करताना प्रथम परिमंडळाची निवड करून पदांच्या निवडीचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल.
निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेसाठी ६० प्रश्न विचारले जातील त्यासाठी १२० गुण असणार आहे तर ७५ मिनिटांचा कालावधी त्यासाठी असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी यावर आधारित प्रत्येकी १५ प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळविणारे उमेदवार लघु टंकलेखन चाचणीसाठी पात्र ठरतील. लेखी परीक्षेतील मार्क आणि लघुटंकलेखन चाचणीमध्ये मिळालेले मार्क एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी बनविली जाईल.
इतर पदांसाठी १०० प्रश्नांची परीक्षा असेल त्याला २०० मार्क असतील तर १२० मिनिटांचा कालावधी असेल. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवर आधारित प्रत्येकी १५ प्रश्न असतील तर तांत्रिक प्रश्नांसाठी ४० मार्क्स असतील.
अर्ज कसा करायचा ? How to apply for the Posts?
ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https:// wrd. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज करताना स्कॅन करून अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी जाहिरातीमध्ये दिलेली आहे ती एकदा काळजीपूर्वक पाहावी. ऑनलाइन अर्ज https:// wrd. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर भरायचा आहे. ऑनालाईन अर्ज भरण्यासाठी २४ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे.
परीक्षा शुल्क :
परीक्षेसाठी खुला प्रवर्गासाठी रु. १,०००/-, मागासवर्गीय प्रवर्गासाठी रु. ९००/- इतकी आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ आहे.