Mahatransco recruitment 2023 महापारेषणमध्ये मेगा भरती…तब्बल 2541 पदांची होणार भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2023/ Government job 2023/ Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd Bharti 2023:

शासकीय नोकरीसाठी तयारी करणा-या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी (Maharashtra Government job). महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये (Mahatransco) भरती प्रकिया राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३ मध्ये 2541 जागा भरल्या जाणार आहेत. विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २ या पदांची भरती होणार आहे. महाट्रान्सको भरती २०२३ साठी अर्ज करण्याची आवश्यक शैक्षणिक पात्रता, शेवटची तारीख तसेच वयोमर्यादा काय आहे याची सविस्तर माहिती पाहूयात.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती- २०२३ जागांचा तपशील (Mahatransco recruitment 2023 details)

विद्युत सहाय्यक (पारेषण) या पदाच्या 1903 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी सरळसेवा भरती होणार आहे. विद्युत सहाय्यक (पारेषण) हे ०३ वर्षांच्या कंत्राटी कालावधीसाठी असणार आहे. उमेदवारांना नियमित पदावर सामावून घेण्याबाबतचा
निर्णय महाट्रान्सस्को प्रशासन घेईल.

वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-१ आणि तंत्रज्ञ-२ या पदांसाठी अनुक्रमे 124,200 आणि 314 जागा भरल्या जाणार आहेत. महापारेषणच्या या भरतीमध्ये एकूण २,५४१ पदांसाठी भरती होणार आहे. तिन्ही पदांची सरळसेवा भरती होणार आहे

शैक्षणिक पात्रता  –

विद्युत सहाय्यक (पारेषण) – उमेदवार राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक असावा.

वरिष्ठ तंत्रज्ञ/तंत्रज्ञ १/ तंत्रज्ञ २ – उमेदवार शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक असावा. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याचे डिटेल्ससाठी मूळ जाहिरात वाचा. https://www.mahatransco.in/

 वयोमर्यादा –

 उमेदवाराचे वय 10.12.2023 रोजी किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे वर्षे असावे. सर्व मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्या दुर्बल घटकांतील नियमानुसार वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे.

वेतनश्रेणीविषयी माहिती

वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु 30810- 1060- 36110- 1160- 47710- 1265- 88190 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.

तंत्रज्ञ-१ या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु  29935-955-34710-1060-45310- 1160-82430 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.

तंत्रज्ञ-२ या पदावर निवड झालेल्या उमेदवारास 29035-710-32585-955-42135-1060-72875 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.

विद्युत सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास १५,000 दरमहा वेतन मिळणार आहे.

अर्ज कसा करावा Mahatransco application

उमेदवारांनी ऑनलाईल अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईला भेट द्यावी. आयबीपीएसच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी मुळ मुलाखतीमध्ये दिलेल्या आयबीपीएसच्या बेवसाईटला भेट द्यावी.

https://ibpsonline.ibps.in/msetcloct23/

परीक्षा शुल्क-Examination Fees

विद्युत सहाय्यक पदासाठी परीक्षेसाठी खुल्या गटाला रू 500 तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी  रु.250 इतके शुल्क असणार आहे. तर दिव्यांग आणि माजी सैनिकांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सुट देण्यात आली आहे.

वरिष्ठ तंत्रज्ञ/तंत्रज्ञ १/ तंत्रज्ञ २ पदाच्या परीक्षेसाठी खुल्या गटाला रू.600 तर मासागवर्गीय उमेदवारांसाठी  रू. 300 शुल्क आहे. तर दिव्यांग आणि माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क नाही.

ऑनलाईन परिक्षेचे स्वरुप.

उमेदवारांची वस्तूनिष्ठ स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.  एकूण १५० मार्कांची परीक्षा असेल त्यासाठी दोन तासांचा म्हणजेच 120 मिनीटांचा कालवधी मिळणार आहे. विजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान(Professional knowledge), तर्कशक्ती (Reasoning) संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative aptitude) आणि मराठी भाषा या विषयांवर आधारित असेल.

महत्वाच्या तारखा Important dates for application

महाट्रान्सकोच्या भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी  २० नोव्हेंबर २०२३ सुरूवात झाली आहे. तर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ आहे.  अर्ज करण्याअगोदर अधिकची माहिती घेण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील जाहिरात काळजीपुर्वक वाचा. ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये होण्याचा अंदाज आहे.

महत्वाच्या लिंक्स

महाट्रान्सकोची अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर जा.

https://www.mahatransco.in/uploads/news/news_1700222982.pdf

https://www.mahatransco.in/uploads/news/news_1700222727.pdf

Leave a Comment